कोकणी मराठा Vs घाटी मराठा

कोकणी मराठा Vs घाटी मराठा ? ..... (नाही असं नाहीय)
स्त्रोत्र : मासिक 'मराठा तरुण'
लेखन : मराठा प्रविण - Mob: 8655665500
तारीख : १८ सप्टेंबर, २०१३
====================

कालच्या दिवशी एका मराठा मित्रानं एक अतिशय खरा-खुरा प्रश्न केला.तो खालील प्रमाणे -----------------------------------------------------------------------------------------
मराठा मित्र-
देशमुख राव ...आम्ही मराठवाड्यातील मराठे आडनावा पुढे पाटील लावतो ..आणि मला हे माहित आहे कि, तुम्ही पिसाळ-देशमुख आहात..Actual क्वेरी हि आहे कि, मराठा समाजामध्ये एक भेद -भाव मला जाणवला..घाटाखालचे (कोकण) Vs घाटी असा..तर प्रश्न असा आहे कि .."कोकणी मराठा इतर भागातील मराठा समाजा बरोबर सोयरिक करण्यासाठी नाही म्हणतो ..तसेच इतर घाटावरील मराठा, कोकण मराठा ला नको म्हणतो..!" असे का आहे ...जात एकच आहे ..मग हि दुजाभावाची बीजे कुठे रोवली गेली आहेत...कोकण भागातील मराठा ला विचारले तर तो म्हणतो आम्ही 96 कुळी आहोत आणि घाटावरील हलके मराठे आहेत ...आणि आमच्या भागामध्ये बघितले तर मराठे म्हणतात कि , आपण 96 कुळी आहोत आणि ते हलके मराठे आहेत ...असे का आहे..
आणि मला हि तफावत दोन्ही ठिकाणी जाणवली..दोन्ही भागात गैरसमज आहे.आहेत मराठाच मग असे का ? मला यात शंका वाटत आहे कि, पूर्वी काही शेवर्षांपूर्वी विशिष्ट लोकानी सकल मराठा समाज एकत्र येऊ नये म्हणून पेरलेली हि बीज आहेत..आणि पूर्वी बहुतांश मराठा हा अज्ञानी होता..भ्रामक गोष्टींवर तेव्हा लगेच विश्वास ठेवला जायचा असे माझे मत आहे..तुम्हाला काय वाटते..!!मी सुद्धा या गोष्टीवर थोडे फार शोधून बघत आहे..!आणि हे असे असू शकते..आणि आजकाल विचार करताना कोणी दिसत नाही हे असे का..ठीक आहे बाबा कि, सोयीरपण करत नाहीत एकमेकात पण याचे कारण काय ? असे विचारले असता उत्तर कोणा जवळ नाही..-----------------------------------------------------------------------------------------------------
मी म्हणालो-
हो, गोष्ट नेहमी पाहण्यात येते कि.. सबंध महाराष्ट्रातील मराठे एकमेकांना 'हलके' ठरवण्याचा प्रयत्न करत असतात.पण आता, आपण थोडं पुढे जावून विचार करायला हवा...सध्याच्या काळानुसार, आज बरेच मराठा हे ;घाटी' किंवा 'कोकणी' मराठा असा फरक विसरत चालले आहेत आणि ते "मराठा" म्हणून एकत्र यायला कुठेतरी सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही, परंतु जेव्हडी व्हायला हवी तेव्हडी झाली नाहीय अजून...
जस जशी आपली मराठा तरुणांची पिढी पुढे शिकत जाईल..त्यांना "एक मराठा" असा अनुभव, विश्वास आणि आपुलकी निर्माण होईल, तस तसे "घाटी मराठा - कोकणी मराठा" हे प्रकार बंद होतील...आणि आपण सर्व मराठा "एक मराठा" म्हणून नांदू..आणि हे नक्कीच होईल..
पूर्वीच्या काळी गाडी, रस्ते-दळणवळणाची साधनं फार नव्हती त्यामुळे लोक सोयरिक करताना दूरच्या गावात आपली नाती गोती करायला प्राधन्य देत नसायचे..डोंगर-दऱ्यामधील गावामध्ये सोयरिक करायला लोक धजावत नसत..उलट डोंगरातील गावांना ज्यांना "वाडी" असं म्हटलं जायचं ....त्यांना "वाडी" मधलं स्थळ नको....वाडी चे लोक असे-तसे म्हणायचे...पण खरं कारण होतं....डोंगर-दऱ्यामधील गावामध्ये दळण वळणाच्या साधनांची कमी असणं...! पण काय आहे कि..."कूच तो लोग कहेंगे, लोगो का काम है, केहना"...या उक्ती प्रमाणे लोक तर बोलतच राहतात!
पण आता, लोक वाडी, कोकण अशा गोष्टींना विसरून पुढे जात आहेत, "मराठा" सोयरिक आहे म्हणून Geographical - भौगोलिक डिफरन्स विसरून नाती जमवत आहेत.
जय मराठा !

Share this

Related Posts

First

4 comments

comments
Anonymous
13 April 2019 at 08:13 delete

Ghati Maratha he Konkani Marathyana apla manatat. Aaj kityek Konkani Maratha he Kolhapur, Belgaon, Pune, Satara ithe sthayik zale . Aaj anek business madhe te pudhe gele karan Ghati Maratha( Deccan Maratha) tyana apulkine vagavtat. Pan hach aplepana Konkani Marathyamadhe disun yet nahi

Reply
avatar
Anonymous
13 April 2019 at 08:25 delete

Chatrapati Shivaji Maharaj he Dhakkan che Raje hote. Mag Konkani/ Kokanastha Marathayanchya mate Ghati/Deccan Maratha he halke kase zale ? Mi Ghati Maratha ahe ani amhala ha anubhav Konkani Pradeshat yeto. Pan amhi ghatatvar stayik zalelya Konkani lokana apla manato. Amhi Marathi bhashik Konkanila apli boli bhasha manato. Pan Konkani lokansathi Marathi bhashik he Ghati ani baherche kase Kay hotat.

Reply
avatar
10 May 2019 at 04:16 delete

Konkani lok nehami Konkani lonkabarobar rahtat.
Te Ghati lokana tyanchya group mdhe yeun det nahi. ha maza kup vela anubhav aahe

Reply
avatar